आर.टी.ई. २५% ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया
टीप:
1) आर.टी.ई. २५% ऑनलाईन प्रवेशाकरिता लागणारी सर्व कागदपत्रे पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपूर्वीची असावीत. त्यानंतरची कागदपत्रे स्वीकारली जाणार नाहीत.
2) बालकाचे आधार कार्ड, रहिवासी पुरावा आणि जन्मतारखेचा पुरावा ही कागदपत्रे आर.टी.ई. प्रवेश पात्र सर्व बालकांसाठी आवश्यक आहेत.
प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे
- वांछित गटातील बालक: अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती (अ), भटक्या जमाती (ब), इतर मागासवर्गीय (ओ.बी.सी.), विशेष मागास बालके (एस.बी.सी.).
- दिव्यांग बालक: जिल्हा शल्यचिकित्सक/वैद्यकीय अधीक्षक यांनी दिलेले ४०% किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र.
- एच.आय.व्ही./एच.आय.व्ही. प्रभावित बालक: वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक.
- कोविड-१९ प्रभावित बालक: पालकांचे मृत्युप्रमाणपत्र आणि कोविडमुळे मृत्यू झाल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र.
- अनाथ बालक: अनाथालयाचे/बालसुधारगृहाचे कागदपत्र किंवा पालकांचे हमीपत्र.
- आर्थिक दृष्ट्या दुर्बल गट: तहसीलदारांचे उत्पन्न प्रमाणपत्र (वार्षिक उत्पन्न ₹१,००,००० पेक्षा कमी).
- घटस्फोटित महिला पालक: न्यायालयाचा निर्णय आणि अन्य आवश्यक कागदपत्रे.
- विधवा महिला: पतीचे मृत्युप्रमाणपत्र आणि रहिवासी पुरावा.
- आधार कार्ड: बालकाचे किंवा पालकांचे आधार कार्ड आवश्यक.
- जन्मतारखेचा पुरावा: ग्रामपंचायत, नगरपालिकेचा दाखला, रुग्णालयातील रजिस्टर किंवा प्रतिज्ञापत्र.
- रहिवासी पुरावा: रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वीज बिल, पाणी बिल, बँक पासबुक इत्यादींपैकी एक.
0 Comments